Bal Mane : आपल्या आमदारकीच्या कारकि‍र्दीत बाळ मानेंनी काय दिवे लावले ? हे जनतेला सांगावे

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने (Bal Mane) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या वाडीतील युवकांनी देखील उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळ माने यांना १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीच्या जनतेने निवडून दिले होते. आपल्या आमदारकीच्या ५ वर्षाच्या कारकिर्दीत बाळ मानेंनी काय दिवे लावले याचा हिशोब जनतेला द्यावा आणि मग मत मागायला जावे असे सडेतोड वक्तव्य मिऱ्या गावाचे रहिवासी भैय्या भाटकर यांनी केले आहे.

Bal Mane : भैय्या भाटकर यांचे सडेतोड विधान

भैय्या भाटकर पुढे बोलतांना म्हणाले कि (Bal Mane) बाळ माने यांनी स्वतः आमदार असताना आमच्या मिऱ्या गावातील एखादे काम सुद्धा मार्गी लावले नाही. यामुळेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ त्यांच्या विरोधात आहेत. मिऱ्या गावामध्ये मंत्री उदय सामंत आणि किरणशेठ सामंत यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. मरीन लाईन्स च्या धर्तीवर पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा मिऱ्या बंधारा देखील केवळ उदय सामंत यांच्या माध्यमातून होत आहे. (Bal Mane) बाळ मानेना गावातील पोट निवडणुकीत देखील आपला उमेदवार निवडून आणता आला नाही ते आता तीन वेळा पराभूत होऊनही चौथ्यांदा आमदारकी लढवत आहेत. रत्नागिरीच्या विकासासाठी मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ढीगभर कामे झाली आहेत. अशा कार्यसम्राट व्यक्ती समोर निवडणूक लढवताना आपण आपल्या आमदारकीच्या काळात काय दिवे लावले याचा हिशोब देखील देणे गरजेचे आहे असे सडेतोड विधान मिऱ्या गावचे रहिवासी भैय्या भाटकर यांनी केले आहे.