◼️ विसर्जनासाठी जिल्ह्यात पोलिस, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
रत्नागिरी : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होत असून मंगळवारी 65 सार्वजनिक तर 37 हजारहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गेले दहा दिवस जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. आरती, भजने, विविध प्रकारच्या नृत्यसंगीताने घरे गजबजून गेली होती. मागील दहा दिवसांत तब्बल एक लाख गणरायांना निरोप देण्यात आला असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी खर्या अर्थाने गणेशोत्सवाची सांगता होत असली तरी जिल्ह्यात काही भागात 21 दिवस किंवा दसर्यापर्यंतही गणेशमूर्ती ठेवण्याची परंपरा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी 65 सार्वजनिक गणेशाला निरोप देण्यात येणार आहे तर जिल्ह्यातील 37 हजारपेक्षा अधिक घरगुती गणरायांचे विसर्जन होणार आहे. दरम्यान, दहा दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी गणेश विसर्जन घाट आणि समुद्रकिनार्यांवर बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 17-09-2024