लांजा : परतीचा पाऊस आणि वन्यप्राणी यामुळे झालेल्या नुकसानीचा शासन स्तरावर त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जि. प. माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक पूर्णपणे पाण्यात गेल्याने या वर्षी शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. यासह शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गवे, रानडुकरे, माकडे यांच्या उपद्रवामुळे शेतीचे व बागायतीचे नुकसान होत आहे. या सगळ्या नुकसानीचा प्रशासनाने गांभीयनि विचार करावा.
शासकीय अधिकारी यांनी त्वरित गावागावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 07/Nov/2024














