खेड : शहरातील शिवतररोड येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून ७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. नरेश रमेश जाधव (४६, सम्राट अशोकनगर) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तो गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत ७० लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल सोहेल ढगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर पोलिसांचे धाडसत्र सुरूच असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 07/Nov/2024














