रत्नागिरी : तालुक्यातील फणसवळे सदाफळवाडी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. करण्यात आली आहे. जनार्दन शंकर जोशी (६५, रा. फणसवळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित हा आपल्या ताब्यात ५१० रुपयांची ५ लिटर दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 07/Nov/2024














