रत्नागिरी : तालुक्यातील डोर्ले-घवाळीवाडी येथे काजऱ्याचे फळ समजून ज्वलनशील पदार्थ उचलल्यामुळे वृध्दाचा हात भाजला. ही घटना मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनीष धोंडू घवाळी (५३, रा. डोर्ले, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ते गुरे चरवण्यासाठी पायवाटेने जात होते. त्यावेळी अज्ञाताने ठेवलेला ज्वलनशील पदार्थ त्यांना रानटी काजऱ्याच्या फळासारखा दिसला. त्यामुळे तो त्यांनी आपल्या हातांनी उचलला असता त्यांच्या उजव्या हातांची बोटे किरकोळ स्वरुपात भाजली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 07/Nov/2024














