देवरूख हायस्कूल येथे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण

देवरूख : काही महिन्यापूर्वी नियुक्ती झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे राज्यव्यापी नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण देवरूख हायस्कूल येथे सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी १५० शिक्षक सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणाची सांगता १० रोजी होणार आहे. शुभारंभाप्रसंगी प्रशिक्षणप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी देवरूखकर यांनी प्रशिक्षण, हेतू, उपयोग, सकारात्मक विचार, गरज आदी मुद्यांवर प्रास्ताविक स्वरूपात मार्गदर्शन केले.

अध्यापनाबरोबरच प्रशासकीय व अवांतर कामाचा अनुभव घेण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे असून भावी काळात या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याने याचे आकलन करा, असे आवाहन विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी आखाडे, मार्गदर्शक दामिनी भिंगार्डे आणि त्यांचे सहकारी समग्र शिक्षाचे कर्मचारी व केंद्रप्रमुख अभिमन्यू शिंदे, समीर काबदुले, सनगले व शिक्षक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 07/Nov/2024