दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थिनींच्या किन्हळ गावातील मृदगंध, कृषी सखी तर देवके गावातील कृषी अक्ष, कृषी निष्ठा, आमची माती आमची माणसं या गटांचा दापोली- किन्हळ येथील खाणजाई देवी मंदिरात कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा उत्साहात झाला.
या प्रदर्शनामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या जातीचे नमुने, विविध यंत्र, अवजारे तसेच माहिती देणारे कृषिविषयक तक्ते, कृषी निगडित विविध मॉडेल्सचे सादरीकरण करत आधुनिक शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 07/Nov/2024














