खेड : तालुक्यातील कुंभाड येथील कै. लक्ष्मी छाया क्रीडा प्रतिष्ठान व चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने खोपी, कुंभाड, मिर्ले, कुळवंडी, बिजघर पंचक्रोशीतील १० ते १५ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी ९ नोव्हेंबरपासून कबड्डी प्रशिक्षणास प्रारंभ होणार आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आयोजित शिबिरात प्रशिक्षणार्थ्यांना तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी सदानंद भोसले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 07/Nov/2024














