रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे नेते बाळ माने यांनी पक्षांतर करीत शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता भाजप कडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केल्याने बाळ माने यांना भाजप पक्षामधून काढून टाकण्यात आले आहे. तसे पत्र भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
भाजप हा एक पक्षशिस्त मानणार पक्ष आहे. पक्षाने घेतलेला निर्णय सर्वोच्च मानत या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपले काम करीत असतात. बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गद्दार म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. गद्दाराला त्याची जागा दाखवा अशा सूचना त्यानी कार्यकर्त्यांना केल्या होत्या. आता बीजेपीच्या राज्यपातळीवरून ही कारवाई करण्यात आली असून बाळ माने यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 07-11-2024













