रत्नागिरी : गणपतीपुळे येथून दर्शन घेऊन येणार्या स्कॉर्पिओ गाडीला निवळी येथे मुंबई – गोवा महामार्गावर वाहन येताना मुंबईकडून आलेल्या दुसर्या मोटारीने जोरदार धडक दिली. त्यात लहान मुलांसह ९ जण जखमी झाले आहेत. धडक इतकी मोठी होती की स्कॉर्पिओमधील सर्व प्रवाशांनी आक्रोश केला.
सर्व जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. काही वेळेतच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथे २४ तास कार्यरत असणारी रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यातून सर्व जखमींना रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व जखमी सांगली जिल्ह्यातील बोरगाव, तालुका वाळवा येथील आहेत.
अपघाताची माहिती अशी – बोरगावचे नऊजण स्कॉर्पिओ एमएच ४२ क्यू ४४४१ ने बुधवारी निघाले. रत्नागिरीत मुक्काम करून गुरुवारी ते गणपतीपुळे येथे आले होते. दर्शन घेऊन ते आज निवळी मार्गे परतू लागले. निवळी येथे महामार्गावर येताना मुंबईकडून येणाऱ्या महिंद्रा एमएच ०५- पिएस ६७३९ या महिंद्रा मराझो या गाडीने जोरदार धडक दिली. त्यात स्कॉर्पिओ गाडीतील ९ जण जखमी झाले.
अपघातातील जखमिंची नावे अशी – १) विमल प्रकाश शिंदे, वय ६०. २) निलेश प्रकाश शिंदे, वय ३६. ३) प्रणाली सुशांत शिंदे, वय २१. ४) ध्रुवराश निलेश शिंदे, वय ८. ५) आदिती निलेश शिंदे, वय ३५. ६) शुभांगी रवींद्र जाधव, वय ४०. ७) जगन्नाथ दीपक पाटील, वय ५०, ८)जयश्री जगन्नाथ पाटील, वय ४५. ९) अवनीश जगन्नाथ पाटील, वय ८.
अपघाताची फिर्याद सौ अश्विनी निलेश शिंदे यांनी दिली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस पुढील तपास करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 08-11-2024














