चिपळूण : महाविकास आघाडीचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दि. ८ रोजी चिपळूण येथे येणार आहेत.
त्यांच्या उपस्थितीत सकाळी १० वा. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर प्रचार सभा आज आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पक्ष निरीक्षक बबन कनावजे, माजी आमदार रमेश कदम, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आ. सुभाष बने, जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, शिवसेना उबाठा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, प्रताप शिंदे, नलिनी भुवड, मधुकर भावे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, रूणा आंब्रे आदी उपस्थित राहाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 08-11-2024












