रत्नागिरी : शहरातील नूतननगर येथे नांदेड येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास उघडकीस आली. गळफास घेतलेला तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. ज्ञानेश्वर शिवराम वरपडे (वय २२, मूळ रा. नांदेड, सध्या रा. नूतननगर, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी रत्नागिरी येथे भाड्याने राहत होता. गुरुवारी दुपारी त्याने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्यासोबत राहणाऱ्या इतर सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या बाबत शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 08-11-2024














