खेड : दाभिळ येथील रामेश्वर आयटीआयात स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर

खेड : खेड तालुक्यातील दाभिळ येथील रामेश्वर शिक्षण संस्था संचालित अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नुकतेच ३ दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले. योगा प्रकारात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या आणि कराटे ब्लॅक बेल्ट पदवी संपादन केलेल्या मुग्धा ढोकळे यांनी रामेश्वर खढख मध्ये ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत खेडमधील युवतींना प्रसंगी स्वतःच्या रक्षणा करीता बचावात्मक ट्रिक शिकविल्या, आरोग्य विषयक टिप्स देखील दिल्या. या अभियानात सर्व महिला प्रशिक्षणार्थ्यांनी तसेच सह शिक्षिका साक्षी तांबे, शीतल मोहिते, सायली आंब्रे यांनीही सहभाग घेतला. संस्थेचे प्राचार्य मकरंद ढोकळे यांनी मुग्धा ढोकळे यांचे स्वसंरक्षण प्रशिक्षण दिल्याबद्दल संस्थेतर्फे आभार मानले. या वेळी सहशिक्षक प्रशांत रायकर, उमेश नाचरे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 08/Nov/2024