रत्नागिरी : राजीवडा येथे रस्त्यात उभे राहिल्याने दुचाकी घसरल्याचा समज करून दगडाने मारहाण

रत्नागिरी : रस्त्यात उभे राहिल्यामुळे आपली दुचाकी घसरल्याचा समज करून एकाला दोघांनी हातांच्या ठोशांनी व दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वा. सुमारास राजीवडा येथे घडली.

शवाफ नजीर कोतवडेकर, जुमेर सऊद वस्ता (दोन्ही रा. राजीवडा जामा मशिद जवळ, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मोहम्मद जैनुद्दीन वस्ता (४२, रा. राजिवडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, मंगळवारी रात्री ते राजीवडा येथील रस्त्यावर पत्नीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी शवाफ कोतवडेकर आपल्या ताब्यातील दुचाकीवर जुमेर वस्ता याला मागे बसवून त्या रस्त्याने जात असताना त्याची दुचाकी घसरली. मोहम्मद वस्ता हे रस्त्यात उभे असल्यामुळेच आपली दुचाकी घसरली असा गैरसमज करुन घेत संशयित दोघांनी फिर्यादीला हातांच्या ठोशांनी आणि दगडाने मारहाण केली. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 08/Nov/2024