रत्नागिरी : कोतवडे (ता. रत्नागिरी) जिल्हा परिषद गटात महायुतीच्या घटक पक्षांचा समन्वय मेळावा झाला. यामध्ये महायुतीकडून रिंगणात असलेले शिंदे शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी तळागाळात जाण्याचा निर्धार करण्यात आला.
निवडणुकीसंदर्भात कोतवडे जिल्हा परिषद गटातील महायुती म्हणजेच शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय व इतर पक्षांची संयुक्त सभा कोतवडेतील घैसास हॉल येथे झाली. या सभेमध्ये महायुतीचे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन ऊर्फ आबा पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख दिलीप शिवलकर, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, जिल्हा सरचिटणीस उमेश कुलकर्णी, भाजप तालुका सरचिटणीस उमेश देसाई, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, उपतालुकाप्रमुख राजू साळवी, आरपीआयचे कोकण उपाध्यक्ष उमेश कदम, दीपक जाधव आणि शिवसेना महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख ज्योती मयेकर, कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या साधना साळवी, महिला विभागप्रमुख स्वरा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद गटातील एकूण ११ गावांमधील कार्यकर्ते या सभेस उपस्थित होते. या वेळी महायुतीचे पदाधिकारी उमेश कुलकर्णी, उमेश देसाई, आरपीआयचे उमेश कदम, भाजपचे विवेक सुर्वे व गजानन पाटील, प्रवीण जोशी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून उदय सामंत यांनाच मतदान करण्यासाठी आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 08-11-2024














