रत्नागिरी : गावडे आंबेरे येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील गावडे-आंबेरे येथे बेकायदेशिरपणे गावठी हाभट्टीची दारू विक्री करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वा. करण्यात आली. प्रदीप प्रकाश शिवनेकर (३३, रा. तिवरेकरवाडी गावडे आंबेरे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार महेश कुबडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा गावडे आंबरे येथील तिवरेकरवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेत झावळीच्या सहाय्याने तयार केलेल्या खोपीमध्ये २ हजार ७६० रुपयांची २५ लिटर दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 08/Nov/2024