रत्नागिरी : नाचणे पॉवर हाऊस येथे रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून रिक्षाला धडक देत अपघात करत स्वतःसह अन्य चार जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वा. सुमारास नाचणे पॉवर हाऊस बस स्टॉपजवळ घडली.

आर्यन संतोष नागवेकर (२०, रा. हातीस, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल बाजीराव कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ३० ऑक्टोबर रोजी लतीकेश भोरे हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०८-बीसी-०४४९) मध्ये शेजारी राहणारे संतोष माचिवले यांचा मुलगा प्रज्वल व मुलगी ऐश्वर्या यांना बसवून रिक्षा नाचणे सुपलवाडी ते मारुती मंदिर दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने चालवत येऊन परकार हॉस्पिटलला जाण्यासाठी नाचणे पॉवर हाउस बसस्टॉपकडून आरोग्य मंदिर दिशेकडे वळवत होता.

त्याच सुमारास आर्यन नागवेकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एबी-७७०५) भरधाव वेगाने मारुती मंदिर ते हातीस असा जात होता. तेव्हा त्याच्या दुचाकीची धडक या रिक्षेला पुढील उजव्या बाजुस बसून हा अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक लतिकेश भारे (२२), संतोष माचिवले (५१), प्रज्ज्वल माचिवले (२२), ऐश्वर्या माचिवले (२०) आणि दुचाकी चालक आर्यन नागेवकर हे पाचजण जखमी झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 08/Nov/2024