पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसाक्षरतेची गरज : गटविकास अधिकारी भरत चौगले

देवरुख : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसाक्षरतेची गरज आहे. वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून लोकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत पाणी समितीला गटविकास अधिकारी भरत चौगले यांनी देवरुख येथील प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी आवाहन केले.

पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) व माटे भोजने सभागृह, देवरुख येथे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विविध पदाधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना चौगले यांनी पाण्याचा लोकजागर सातत्याने व्हावा, पाण्याचे समज व उमग वाढावी, पाण्याचा वापर नेमका व्हावा, पाणी पुरवठ्यासोबत गरजा मर्यादित आणि कमी करण्याकडे लोकांनी कल वाढवावा तसेच पाणी प्रश्नाशी निगडित सर्व मुद्द्यांचा संतुलितपणे विचार व्हावा यासाठी मार्गदर्शन केले. जलसाक्षरतेची गरज असून, सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होण्याचे केले. आवाहन त्यांनी यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद शिंदे, विस्तार अधिकारी शंकर घुले, जे. पी. एस. फाउंडेशन लखनऊचे सर्व प्रतिनिधी साधन व्यक्ती व जिल्हा स्तरावरील सर्व सल्लागार उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 08/Nov/2024