गुहागर : जानवळेतील योगिता खाडे हिने उझबेकिस्तान येथे झालेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. उझबेकिस्तान येथे नुकत्याच झालेल्या मार्शल आर्ट स्पर्धेत योगिता ही योगिता खाडे भारताकडून खेळत होती. यावेळी तिने भारताकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने मार्शल आर्टमध्ये सुवर्णपदक मिळवल्याचे कळताच गुहागरमध्ये आनंद साजरा करण्यात आला. योगिता हिने केवळ गुहागरचेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर पोहोचवले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 08/Nov/2024














