देवरुखातील श्री विठ्ठल मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

देवरुख : शहरातील श्री देव विठ्ठल मंदिरामध्ये ११ ते १६ या कालावधीत कार्तिक व त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन विविध धार्मिक कार्यक्रमांनी करण्यात आले. मंदिरामध्ये अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी काकडा आरती देखील सुरू आहे. उत्सवामध्ये ११ ते १५ कालावधित सायं. ५.३० वा. इचलकरंजी येथील कीर्तनकार ह. भ. प. श्रद्धा गोडसे यांचे कीर्तन होणार आहे. याला तबला साथ नील भावे तर संवादिनी साथ कुंदन कुलकर्णी यांची लाभणार आहे. रात्री ७.३० वा. आरती व मंत्रपुष्प होणार आहे. १२ रोजी कार्तिकी एकादशी दिन सकाळी ८ वा. नित्य पूजा व पवमान अभिषेक, १४ रोजी वैकुंठ चतुदर्शीचे औचित्य साधून मंदिरामध्ये विष्णू याग व दुपारी पूर्णाहुती आणि प्रसाद, १५ रोजी रात्री ९.३० वा. तुलसीमाईचा शुभविवाह व त्रिपूर लावून दीपोत्सव, १६ रोजी पहाटे ५.३० वा. काकडा आरती व दिंडी व उत्सवाची सांगता होणार आहे. १९ रोजी उत्सवाची समाराधना महाप्रसादाने होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 08/Nov/2024