रत्नागिरी : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी राज्यात केंद्र व राज्य पुरस्कृत घरकूल योजना राबविण्यात येते. मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजना या योजनेतून अधिकाधिक नागरिकांना घरकूल मिळाली पाहिजेत.
यासाठी या योजनेंतर्गत करण्यात येणारी घरकुलांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी पात्र लाभार्थ्यांची केंद्र सरकारच्या आवास या संगणक प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षी पात्र लाभार्थ्यांना तीन लाख घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना वेळेत घरकूल मिळण्यासाठी व दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारच्या आवासमध्ये नोंदणी करता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:20 PM 08/Nov/2024














