राजापूर : पाचल बाजारपेठेतील राजगड ठरतोय लक्षवेधी

पाचल : पाचल बाजारपेठेत पाचल जवळेथर रस्त्यानजीक शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेला राजगड किल्ला विशेष लक्षवेधी ठरत आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधत बारपेठेतील रवींद्र जुवे, प्रेम जुवे, वीरेंद्र जुवे, जीत जुवे, रोहन पडियार, निखील पडियार, राहुल पडियार, आदित्य जुवे या शालेय विद्यार्थ्यांनी इतिहासाची साक्ष देणारा राजगड किल्ला बनवला आहे. हा गड साऱ्यांच्याच कौतुकास पात्र ठरत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपला ऐतिहासिक वारसा टिकून राहावा म्हणून मुले आवडीने किल्ले तयार करतात.

मातीपासून तयार केलेला किल्ला, रंगबिरंगी रंग आणि विद्युत रोषणाईने सजवून आपल्यातील कला सादर करीत सुट्टीचा आनंद द्विगणीत केला आहे, त्यांनी बनविलेल्या या किल्ल्याचे परिसरात कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 08/Nov/2024