गुहागर : विधानसभा सार्वजनिक निवडणूक २६४ गुहागर विधानसभा स्वीप उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी मतदार जनजागृती केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने व गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. पी. पालशेतकर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ते गुहागर तहसीलदार कार्यालय मैदान ते शृंगारतळी पेट्रोल पंप अशी दुचाकी रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे नेतृत्व गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी केले. प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र कुळे, अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मनोज पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, नरेंद्र देवळेकर, अपंग प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, तज्ज्ञ मार्गदर्शक दिनेश जाक्कर, प्रताप देसले यांच्यासह तालुक्यातील १८० शिक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षण सेवकांनी मतदार जनजागृती विषयक पथनाट्य सादर केले. त्यानंतर पालशेत हायस्कूल, पालशेत बाजारपेठ, मोडकाआगर, गुहागर एसटी स्टैंड, गुहागर तहसीलदार कार्यालय, शृंगारतळी पेट्रोल पंप या दरम्यान प्राथमिक शिक्षकानी उस्फूर्तपणे दुचाकी रॅलीद्वारे मतदानाचे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मतदान करून आपले कर्तव्य पूर्ण करावे व लोकशाही बळकट करण्यास हातभार लावावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 08/Nov/2024













