देवरुख : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा बुधवारी देवरुख येथे पार पडला. या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
शहरातील मराठा भवन येथे हा मेळावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विनायक राऊत यांनी आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या मेळाव्यामध्ये माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, मधुकर भावे, नेहा माने, विलास चाळके, सुरेश बने, संजय कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 08/Nov/2024














