रत्नागिरी : साखर आंबेरवाडी (ता. राजापूर) येथे लहानपणापासून फीट येण्याच्या आजाराला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपेश कृष्णा राज्ये (३२, रा. साखर आंबेरवाडी, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी साखर आंबेरवाडी येथील राहत्या घराच्या मागील पडवीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश यांना लहानपणापासून फीट येण्याचे आजारपण होते. आजारपणाला कंटाळून त्याने घरात कुणीही नसल्याचे पाहून स्वतःहून नायलॉन रस्सी घराच्या मागील पडवीत छताच्या लोखंडी वाशाला बांधून गळफास घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 08/Nov/2024














