चिपळूण : स्वस्तिक प्रतिष्ठान आणि विक्रांत मित्र मंडळ वरचा फगरवठार, रत्नागिरी येथील युवकांनी दिवाळी मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारून शिवरायांच्या विचारांच्या पाऊलखुणा जागवल्या आहेत.
किल्ले, गड दिवाळीत बनवून एकप्रकारे इतिहास नव्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी स्वतिक प्रतिष्ठान आणि विक्रांत मित्र मंडळ कौतुकास्पद कार्य करीत आहे. ही प्रतिकृती निशांत सूवरे, ओमकार रावणांक, आराध्य पालकर, अक्षय पालकर, आर्यन पालकर, आर्यन सुवरे, तेजस पेजे, उदय पेजे, अथर्व रायकर, अमेय शिवगण, साईप्रसाद गोताड, सुयश रायकर, नेहाल जाधव, संतोष गवाणकर आणि हर्षद रावणांक तयार केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 08-11-2024














