देवरुख : शहरातील आठल्ये सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाकडून आयोजित ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ साखरपा, कोंडगाव येथील कबनुरकर हॉलमध्ये वातावरणात झाला. शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्यासह कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा. प्रवीण जोशी, सहाय्यक अमोल वेलवणकर उपस्थित होते. शिबिरार्थीना श्रीधर कबनूरकर यांनी शुभेच्छा देऊन स्वयंशिस्त व सामाजिक अनुकूलनाचे महत्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी एन. एस. एस. विभागाचे सामाजिक योगदान, विद्यार्थी स्वयंसेवकांना होणारे वैयक्तिक लाभ, उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर सिद्ध करण्याची असणारी संधी याबाबत विवेचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मयुरेश राणे यांनी व तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण जोशी यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 08/Nov/2024














