राजापूर तालुक्यातून एकही हरकत नाही; पश्चिम घाटातील वनसंपदेचे होणार जतन

राजापूर : विविधांगी निसर्गसंपदेने नटलेल्या पश्चिम घाटातील निसर्गसंसदेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनातर्फे घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील 311 गावांमध्ये तालुक्यातील 51 गावाचा समावेश आहे. पर्यावरण संवेदनशीत क्षेत्राबाबत शासनाकडून लोकांच्या साठ दिवासामध्ये हरकती मागविल्या आहेत. त्याला सुमारे दीड महिन्याचा कालावधी उटला तरी अद्याप तालुक्यातून एकही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून दिली. निसर्गसंपदेने नटलेल्या पश्चिम घाटामध्ये दुर्मिळ वनसंपदेचा समावेश आहे. विविध कारणांमुळे ही वनसंपदा धोक्यात येण्याची शक्यता समाजाच्याच्या विविध स्तरांमधून व्यक्त केली जात आहे. आहे. पश्चिम घाटातीत वनसंपदेचे गावे जतन आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यातून, केंद्र शासनाच्या मंत्रालयापर्यंत पश्चिम घाटातील काही क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हातील समाविष्ट असलेल्या 311 गावांमध्ये ५१ गावांचा समावेश आहे. पर्यावरणदृष्ट्या संवदनशील गावे म्हणून प्रसिद्ध पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावे म्हणून समावेशाबाबतच्या अधिसूचनेवर साठ दिवसांमध्ये शासनाने हरकती मागविल्या आहेत. याबाबतची अधिसूचना 31 जुलैला प्रसिद्ध करण्यात आली. त्याची येत्या सोमवारपर्यंत (ता.30) अंतिम मुदत राहणार आहे. ही अधिसूचना जाहीर होवून सुमारे दीड महिन्याच्या कालावधी उलटला, तरी तालुक्यातील गावांमधून एकही हरकत दाखल झालेली नाही.

राजापुरात समाविष्ट ५१ गावे अशी
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये राजापुरातातील आगरेवाडी, बाग काझी हुसेन, बांदीवडे, भराडे, चिखले, धामणपे, डोंगर, गोठणे दोनिवाडे, हरळ, हीं, हसोळतर्फे सौदळ, हातदे, जांभवली, काजीर्डा, करक, कारवली, केळवडे, खिणगिणी, कोळंब, कोळवणखडी, कोंडदसूर, कोडसरखुर्द, कोतापूर, कुंभवडे, महाळुंगे, मिळंद, मोसम, ओशिवळे, पाचार, पहिलीवाडी (ताम्हाणे), वाल्ये, पांगरी बुद्रुक पांगरी खुर्द, पन्हाळेतर्फे सौदा, परूळे, पाथडे पाटकरवाडी, फुपरे प्रिदांवण, कोंडयेतर्फ राजापूर, सौदळ, सावडाव, शेजवली, तिवरे, वाल्ये, वरसी गुरववाडी, वरचीवाडी, वाळवड, वाटूळ, येरडव झर्ये या गावांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 24/Sep/2024