Lavani Empress Shakuntalatai Nagarkar Pass Away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन

Lavani Empress Shakuntalatai Nagarkar Pass Away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन

कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, महाराष्ट्राच्या लोककला आणि संगीत बारी विश्वावर शोककळा

Lavani Empress Shakuntalatai Nagarkar Pass Away या दुःखाद वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. स्वतःच्या मेहनतीवर लावणीला समृद्ध करणाऱ्या आणि पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे २२ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची ही प्राणज्योत मालवली.

शकुंतलाताई नगरकर यांचा जन्म १९६० मध्ये अहिल्यानगर (अहमदनगर) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई छबूबाई नगरकर या स्वतः त्या काळातील नामांकित लावणी कलावंत होत्या. घरातूनच मिळालेला हा वारसा पुढे चालवत शकुंतलाताईंनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण केले. पुढे १९७४ मध्ये मुंबईतील गिरणगावातील प्रसिद्ध लालबाग येथील ‘हनुमान थिएटर’मधून त्यांच्या लावणीचा प्रवास खऱ्या अर्थाने बहरला.

त्यांची मुख्य ओळख पारंपरिक संगीत बारी आणि बैठकीच्या लावणीतील अद्वितीय नृत्यांगणा म्हणून होती. लावणीचा बाज केवळ पारंपरिक तमाशाच्या फडापुरता मर्यादित न ठेवता तो आधुनिक शहरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांनी कथक गुरू वसंतराव घाटगे यांच्याकडून शास्त्रोक्त नृत्याचे शिक्षण घेतले होते, ज्यामुळे त्यांच्या बैठकीच्या लावणीला एक वेगळीच शास्त्रीय उंची प्राप्त झाली. दिग्दर्शक भूषण कोरगावकर यांच्या ‘संगीत बारी’ या लोकप्रिय नाट्यप्रयोगातून त्यांनी आधुनिक प्रेक्षकांसमोर बैठकीच्या लावणीची समृद्ध परंपरा मांडली.

Tata altroz

नव्या पिढीला लावणीशी जोडण्यासाठी त्यांनी ‘लावणी के रंग’ आणि ‘लव्ह अँड लावणी’ यांसारखे आधुनिक प्रयोग केले, परंतु हे करताना त्यांनी लावणीचा मूळ पारंपरिक बाज कधीही सुटू दिला नाही. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’, २०१८ मध्ये ‘मुंबई महापौर पुरस्कार’ आणि २०२३ मध्ये ‘नाट्य गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संगीत बारीच्या विश्वातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.