Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे निधन; ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे निधन; ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती; दुःखाच्या काळात मुखर्जी कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे चाहत्यांना आवाहन

Rani Mukherjee Mother Death या दुःखाद वृत्ताने संपूर्ण बॉलिवूडवर आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिची आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या कठीण प्रसंगाने मुखर्जी कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

या दुःखाद घटनेची अधिकृत माहिती राणी मुखर्जी यांचे पती आदित्य चोप्रा यांच्या ‘यशराज फिल्म्स’ने (Yash Raj Films) सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावूक पोस्ट शेअर करून दिली आहे. "अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही राणी मुखर्जी यांच्या आई श्रीमती कृष्णा मुखर्जी यांचे निधन झाले असल्याची माहिती देत आहोत. या कठीण काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा (प्रायव्हेसी) आदर केला जावा, अशी विनंती आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद," असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकार आणि नेटकऱ्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

कृष्णा मुखर्जी या प्रसिद्ध फिल्ममेकर दिवंगत राम मुखर्जी यांच्या पत्नी होत्या. त्यांनी स्वतः कधीही चित्रपटांमध्ये अभिनय केला नसला तरी त्या सिनेसृष्टीशी जवळून जोडलेल्या होत्या. कृष्णा मुखर्जी यांनी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून काम केले होते. २०१७ मध्ये राणी मुखर्जी यांचे वडील राम मुखर्जी यांचे निधन झाले होते.

Radhakrushna patapedhi

राणी मुखर्जी आपल्या आईच्या अत्यंत जवळ होती. राणीच्या बॉलिवूडमधील यशस्वी करिअरमध्ये तिच्या आईचा फार मोठा वाटा आणि पाठिंबा राहिला आहे. राणी मुखर्जीच्या चित्रपटांचे स्क्रीनिंग असो वा कोणतेही महत्त्वाचे कार्यक्रम, कृष्णा मुखर्जी नेहमीच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असायच्या. त्यांच्या निधनामुळे राणी मुखर्जी आणि संपूर्ण कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.