बेहेरे एसटी बस थांब्याजवळ निष्काळजीपणे वाहन उभे केल्याप्रकरणी कारवाई
Pawas Purnagad Traffic Obstacle News संदर्भात रत्नागिरी तालुक्यातील पावस-पूर्णगड मार्गावरून एक बातमी समोर आली आहे. रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिसांनी एका चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २० सप्टेंबर रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
ताबीशमियाँ अब्दुल हमीद सोलकर (वय ५९, रा. घर क्र. ५४३, गाझी मोहल्ला, साखरेनाटे, ता. राजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावस ते पूर्णगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर बेहेरे एसटी बस थांब्याजवळ सोलकर यांनी त्यांच्या ताब्यातील टाटा सुमो गाडी (MH 43 N 4064) अत्यंत निष्काळजीपणे उभी केली होती.
त्यांनी हे वाहन रस्त्यात अशा पद्धतीने उभे केले होते, ज्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच इतर वाहनांच्या रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता आणि अपघाताचा धोका संभवत होता. सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी पूर्णगड पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.














