चालक जखमी
Bhoste Khed Bridge Rickshaw Accident संदर्भात मुंबई-गोवा महामार्गावरील खेड परिसरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भोस्ते ते खेड पुलावर रिक्षाचा अपघात होऊन यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुनील काळूसाहेब गुरव (वय ४५, रा. भिले, चिपळूण) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील रिक्षाचालक सुनील गुरव हे आपल्या ताब्यातील रिक्षा (MH 08 A 09789) घेऊन प्रवासी भाडे सोडण्यासाठी खेडच्या दिशेने येत होते.
प्रवासादरम्यान भोस्ते ते खेड पुलावर आले असता त्यांच्या रिक्षाला भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक सुनील गुरव यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी रिक्षाचालकाला ‘जय हिंद’ रुग्णवाहिकेने तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.













