उक्षी गावचे माजी सरपंच तथा उबाठा गावचे कट्टर शिवसैनिक अन्वर गोलंदाज यांचा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

◼️ अन्वर गोलंदाज यांनी केला शिवसेनेत प्रवेश उदय सामंत यांच्या प्रचारात सक्रिय होणार

◼️ अन्वर गोलंदाज यांच्यावर रत्नागरीच्या अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख पदाची दिली जबाबदारी

◼️ बाळ माने यांना दुसरा धक्का… खाडी पट्ट्यातील अल्पसंख्याक नेते अन्वर गोलंदाज शिवसेनेत

त्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावचे माजी सरपंच, उबाठा गटाचे कट्टर समर्थक अन्वर गोलंदाज यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्ष जाहीर पक्ष प्रवेश केला.

उबाठा गटाचे कट्टर सर्थक तथा आघाडीचे विद्यमान उमेदवार बाळ माने याचे मित्र अन्वर गोलंदाज यांनी अखेर मशाल वीजवत धनुष्यबाण हाती घेतले आहे. अन्वर गोलंदाज हे गेली ३०/३५ वर्षे उबाठा गटाचे कट्टर समर्थक असून ते गेली अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करत होते. त्यांनी गावाच्या विकासासाठी पाठपुरावा आहे. अखेर त्यांनी गावाच्या विकासासाठी अखेर उदय सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

उदय सामंत यांना खाडी पट्ट्यातून मोठे लीड मिळवून देण्यासाठी आज पासून प्रचाराला लागणार असल्याचे अन्वर गोलंदाज यांनी उदय सामंत यांना शब्द दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 08-11-2024