रत्नागिरीत रात्री गारवा तर दिवसा उकाडा

रत्नागिरी : कमाल तापमानात चढ उतार कायम राहिल्याने कोकण किनारपट्टी भागात पहाटे गारवा आणि दिवसा उकाडा अशी संमिश्र वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे.

नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस होत आले तरी अपेक्षित थंडी न पडल्याने आता आंबा बेगमीचे नियोजन करण्यात बागायतदारांना अडचणी येत आहेत. थंडीची चाहूल लागताच बागायतदारांची फवारणीची जुळाजुळव सुरू होते. मात्र पहाटे पडणाऱ्या थंडीत सातत्य न राहिल्याने फवारणी सुरू झाली नसल्याचे बागायतदार राजन वाडकर यांचे म्हणणे आहे. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी पहाटे तापमान २८ अंशांपेक्षा पेक्षा खाली होते. मात्र सकाळी आठनंतर ते २९ अंशांवर झेपावले. दुपारी ते ३१ अंशांवर गेले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 09-11-2024