Jijau Sanstha Lecture Deorukh: देवरूखमध्ये ३० सप्टेंबरला प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान

Jijau Sanstha Lecture Deorukh: देवरूखमध्ये ३० सप्टेंबरला प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान

“कोकणचा सर्वांगीण विकास हाच जिजाऊचा ध्यास” संकल्पनेवर मार्गदर्शन; नीलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

Jijau Sanstha Lecture Deorukh उपक्रमांतर्गत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था (रत्नागिरी विभाग व संगमेश्वर-देवरूख तालुका) यांच्या वतीने बुधवारी (३० सप्टेंबर) प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक आणि प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन संपतराव बानगुडे पाटील यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. देवरूख शहरात प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रथमच व्याख्यान होत असल्याने स्थानिक नागरिक आणि युवकांमध्ये उत्सुकता आहे.

माटे-भोजने हॉल येथे सकाळी ९ वाजता आयोजन

"कोकणचा सर्वांगीण विकास हाच जिजाऊचा ध्यास" या मुख्य संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये कोकणातील शिक्षण, सामाजिक विकास, युवकांसाठी रोजगाराच्या व स्पर्धा परीक्षांच्या संधी यावर प्रा. बानगुडे पाटील मार्गदर्शन करतील. हे व्याख्यान बुधवारी सकाळी ९ वाजता देवरूख येथील माटे-भोजने हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

Radhakrushna patapedhi

विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ संगमेश्वर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक, शिक्षक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या रत्नागिरी व देवरूख शाखेकडून करण्यात आले आहे.