Ratnagiri RTI Day Celebrations: जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माहितीचा अधिकार दिन’ उत्साहात साजरा

Ratnagiri RTI Day Celebrations: जिल्हाधिकारी कार्यालयात 'माहितीचा अधिकार दिन' उत्साहात साजरा

तहसीलदार बजरंग चौगुले यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी : नागरिकांना शासनाच्या कामकाजाची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि प्रशासनात पारदर्शकता वाढावी, यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार (सर्वसाधारण) बजरंग चौगुले यांनी केले. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘माहितीचा अधिकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायद्याचे महत्त्व आणि पारदर्शकता

कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना बजरंग चौगुले म्हणाले की, नागरिकांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत व्यापक जनजागृती निर्माण करणे हाच हा दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या अधिकारामुळे सामान्य नागरिकांना सरकारी कारभाराची अधिकृत माहिती मिळवणे सहज शक्य झाले आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत झाली असून भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी हा कायदा अत्यंत प्रभावी ठरत आहे.

Mahrashi karve ANM