State Cabinet Decision 10th 12th Exam Fee Waiver: १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता परीक्षा फी घेऊन ‘रिफंड’ नाही, थेट माफीच!

State Cabinet Decision 10th 12th Exam Fee Waiver: १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता परीक्षा फी घेऊन 'रिफंड' नाही, थेट माफीच!

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्देश

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे शुल्क (Exam Fees) जमा करून ते नंतर परत (Refund) करण्याच्या किचकट आणि त्रासाच्या प्रक्रियेपेक्षा आता सुरुवातीलाच परीक्षा फी घेतली जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली.

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना थेट फी माफी; तांत्रिक अडचणींचा त्रास टळणार

राज्यात सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांकडून परीक्षेची फी वसूल करून नंतर प्रशासकीय प्रक्रियेद्वारे ती रिफंड करण्यापेक्षा ती फीच न आकारणे अधिक योग्य ठरेल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Tata SUV

पहिल्या यादीतून वगळलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांनाही मिळणार न्याय

दुष्काळ निवारणाच्या आढाव्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विचित्र हवामान परिस्थितीकडे लक्ष वेधले. पावसाळ्यातील पहिल्या दोन महिन्यांत पाऊस झाला, मात्र त्यानंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक तालुके केवळ तांत्रिक निकषांमुळे सरकारी मदतीपासून वंचित राहत असल्याचे समोर आले होते. यावर तोडगा म्हणून पहिल्या यादीत समाविष्ट न झालेल्या दुष्काळबाधित तालुक्यांनाही सुधारित निकषांनुसार मदत देण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे एकाही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.