रत्नागिरी : यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सध्या जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध प्रकारे जागृती केली जात आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, त्यासाठी मतदान प्रक्रिया २० रोजी होणार आहे. यंदा १८ ते १९ वयोगटांतील नवमतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासोबत बैठक घेऊन १८ वर्षांवरील नवमतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्याचे आवाहन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच १६ आणि १७ वयोगटांतील विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून मतदानासाठी नियुक्त करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 09/Nov/2024