चिपळूण : संस्कृतभारतीच्या कोंकण प्रांताचे संमेलन यावर्षी दि. ९ व १० नोव्हेंबर या कालावधीत श्री क्षेत्र परशुराम येथील एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, परशुराम (चिपळूण) येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई ते गोवा या कोकण प्रांतातील संस्कृत शिक्षक, संस्कृत भाषेची सेवा करणारे सुमारे ३०० कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत. एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल व संस्थान श्री भार्गवराम परशुराम न्यासाच्या सहयोगातून हे संमेलन आयोजित होत आहे.
या संमेलनामध्ये विज्ञानप्रदर्शिनी, वस्तुप्रदर्शिनी, भारतीय ज्ञानप्रदर्शिनी, अर्थशास्त्रप्रदर्शिनी, अशा वैविध्यपूर्ण गोष्टींसोबतच उद्बोधक सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
कर्नाटक राज्यातील उच्च शिक्षण विभागाचे निवृत्त संचालक प्रो. टी. एन. प्रभाकर यांचे ‘कुटुंब प्रबोधन’ या विषयावर विशेष उद्बोधन होणार आहे. दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:४५ ते ९:०० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमात चिपळूण येथील स्थानिक कलाकार संस्कृत गीते सादर करणार आहेत. संस्थान श्री भार्गवराम, परशुरामचे अध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर हे स्वागत समितीचे अध्यक्ष तर प्रशांत पटवर्धन उपाध्यक्ष आहेत. डी.बी.जे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. माधव बापट उद्घाटक म्हणून तसेच ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका शीला केतकर, डॉ. अश्विनी गणपत्ये, प्रवचनकार धनंजय चितळे व अर्चना बक्षी या स्वागत समिती सदस्य आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 09/Nov/2024














