Captain Smit Machhar Reaction News: कॉकपिटमधील हल्ल्यानंतर भारतीय पायलट स्मित मच्छार यांची पहिली प्रतिक्रिया; पोस्ट शेअर करत मानले सर्वांचे आभार

Captain Smit Machhar Reaction News: कॉकपिटमधील हल्ल्यानंतर भारतीय पायलट स्मित मच्छार यांची पहिली प्रतिक्रिया; पोस्ट शेअर करत मानले सर्वांचे आभार

‘विमान सुरक्षित उतरले हेच माझे कर्तव्य’; सौदीत सुरक्षित लँडिंग करून १८० प्रवाशांचे प्राण वाचवल्यानंतर स्मित मच्छार भावूक

नवी दिल्ली : दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (Flydubai) विमानाच्या कॉकपिटमध्ये ओमानच्या सहवैमानिकाने (Co-pilot) केलेल्या प्राणघातक हल्ल्याला न घाबरता १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय pilot स्मित मच्छार यांनी घटनेनंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या कॅप्टन मच्छार यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत देशवासीयांचे आणि जगभरातील नागरिकांचे आभार मानले आहेत.

‘मी केवळ माझे कर्तव्य बजावले’ – कॅप्टन स्मित मच्छार

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांनी म्हटले आहे की, "ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मला पाठिंबा दिला आणि प्रेम व प्रोत्साहनाचे संदेश पाठवले, त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझे सहकारी भारतीय, माझे सह-कर्मचारी, प्रवासी, विमान कर्मचारी आणि जगभरातील ज्यांनी या कठीण काळात मला साथ दिली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो."

Radhakrushna patapedhi

पुढे बोलताना ते म्हणाले, "एक वैमानिक म्हणून मी केवळ माझे कर्तव्य बजावत होतो. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित आहेत, याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याचे महत्त्व मला शब्दांत मांडता येणार नाही, ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे."

कॉकपिटमधील थरार आणि अपहरणाचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लायदुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जात असताना कॉकपिटमध्ये अचानक हाय-व्होल्टेज ड्रामा घडला. ओमानच्या सहवैमानिकाने विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याला रोखण्यासाठी कॅप्टन स्मित मच्छार त्याच्याशी भिडले. या दरम्यान झालेल्या झटापटीत सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ते जखमी झाले.

परिस्थिती हाताबाहेर जात असताना विमानातून ‘७५००’ हा ट्रान्सपॉन्डर कोड पाठवण्यात आला, जो सामान्यतः विमान अपहरण (Hijack) किंवा बेकायदेशीर हस्तक्षेपासाठी वापरला जातो. ३३ हजार फुटांवरून अत्यंत वेगाने खाली येणाऱ्या या विमानावर रक्ताने माखलेल्या अवस्थेतही कॅप्टन मच्छार यांनी नियंत्रण मिळवले आणि विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. त्यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे १८० प्रवाशांना नवीन जीवनदान मिळाले आहे.