Devrukh Election Protest: देवरुखात उद्या ‘निवडणूक आयुक्त हटाओ’ आंदोलन; तहसील कार्यालयासमोर निदर्शने होणार

Devrukh Election Protest: देवरुखात उद्या 'निवडणूक आयुक्त हटाओ' आंदोलन; तहसील कार्यालयासमोर निदर्शने होणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची हाक; युयुत्सु आर्ते यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

देवरूख (रत्नागिरी): भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देवरूख येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त उद्या, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर ‘निवडणूक आयुक्त हटाओ’ आंदोलन छेडण्यात येणार आहे. आंदोलनानंतर स्थानिक प्रशासनामार्फत संबंधित मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

आंदोलनातील मुख्य मागण्या आणि प्रसिद्धीपत्रक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची या पदावरून त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे लावून धरली जाणार आहे. याशिवाय त्यांच्याविरोधातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित निवडणुका रद्द करून त्या ठिकाणी बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणुका घेण्यात याव्यात आणि केंद्र सरकारला त्वरीत बरखास्त करण्यात यावे, अशा विविध मागण्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडण्यात आल्या आहेत.

Tata nexon

युयुत्सु आर्ते यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनात स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन युयुत्सु आर्ते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.