Guhagar Student Safety Program: गुहागरमध्ये विद्यार्थी सुरक्षा आणि बालसंरक्षणविषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

Guhagar Student Safety Program: गुहागरमध्ये विद्यार्थी सुरक्षा आणि बालसंरक्षणविषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

‘मिशन प्रबोधन’ व ‘मिशन अभय’ अभियानाद्वारे श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन

गुहागर (रत्नागिरी): गुहागर शहरातील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथे शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा आणि बालसंरक्षणविषयक मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवारी अत्यंत उत्साहात पार पडला. रत्नागिरी पोलीस दलातर्फे नागरिकांमध्ये सुरक्षितता, सजगता व स्वसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन प्रबोधन’ व ‘मिशन अभय’ या विशेष अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायबर सुरक्षा आणि पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन

‘मिशन अभय’ अंतर्गंत गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, पोक्सो कायदा २०१२ (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा), बालसंरक्षण तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गुहागर पोलीस ठाण्याच्या पोलीस काॉन्स्टेबल सीमा मोरे आणि सारिका चाळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Shanti 4

चांगला व वाईट स्पर्श ओळखण्याचे धडे

यावेळी पोक्सो कायद्यांतर्गत बालकांचे संरक्षण, ‘गुड टच आणि बॅड टच’ (चांगला व वाईट स्पर्श) यातील फरक, तसेच कोणतीही संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्यास घाबरून न जाता त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत कशी घ्यावी, याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस काॉन्स्टेबल रुचिता ताम्हणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शालेय प्रशासनाचा सहभाग

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती देवकर यांनी केले, तर उपमुख्याध्यापिका मनीषा सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.