‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाची मोठी तूट; मेघालयात सर्वाधिक ६० टक्के घट, २०१५ नंतरचा सर्वात कमी पाऊस
पुणे : यंदाचा मान्सून हंगाम हा देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ८० वर्षांतील सर्वात १० कमकुवत मान्सूनपैकी एक ठरला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, यापूर्वी अलीकडच्या काळात २००९ आणि २०१५ चे मान्सून हंगाम अत्यंत कमकुवत नोंदवले गेले होते. यंदा देशातील तब्बल ९९ टक्के राज्यांमध्ये अपुऱ्या पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयात तब्बल ६० टक्के तूट नोंदवली गेली आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२ टक्के पाऊस कमी
भारतात मान्सूनची वार्षिक सरासरी ८६८.६ मि.मी. इतकी मानली जाते. मात्र, यंदाच्या हंगामात केवळ ७४९.२ मि.मी. म्हणजेच सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व, ईशान्य, मध्य आणि उत्तर भारतातील काही भागांत सर्वदूर पाऊस झाला. यामुळे अवघ्या चार-पाच दिवसांत पावसाची तूट १५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर खाली आली. तरीही, २०१५ नंतरचा हा भारतातील पहिलाच अपुरा पाऊस असलेला मान्सून हंगाम ठरला आहे.

स्वातंत्र्यानंतरचे १० सर्वात कमकुवत मान्सून हंगाम
देवाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली असून या काळात एकूण १० मान्सून हंगाम तीव्र कमकुवत मानले गेले आहेत. यंदाचा २०२६ चा मान्सून या १० कमकुवत मान्सूनच्या यादीत समाविष्ट झाला आहे:
१९५१: स्वातंत्र्यानंतरचा पहिला मोठा कमकुवत मान्सून.
१९६५: देशव्यापी तीव्र दुष्काळ आणि अन्नधान्य टंचाईचे वर्ष.
१९६६: सलग दुसऱ्या वर्षी मान्सून अत्यंत कमकुवत.
१९७२: ‘अल निनो’च्या तीव्र प्रभावामुळे सरासरीपेक्षा तब्बल २४ टक्के कमी पाऊस; सर्वात गंभीर वर्ष.
१९८२: ‘अल निनो’मुळे मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावून सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस.
१९८७: अत्यंत भीषण टंचाई; देशातील ६० टक्के शेती क्षेत्राला मोठा फटका.
२००२: जुलै महिन्यात पावसाने पूर्ण ताण दिल्यामुळे सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस.
२००९ आणि २०१५: २१ व्या शतकातील सर्वात कमकुवत मान्सून; पाऊस २२ टक्क्यांनी घटला.
२०२६ (चालू वर्ष): ‘अल निनो’च्या प्रदीर्घ प्रभावामुळे सर्वाधिक कमकुवत ठरलेला मान्सून.













