खेड : लोटेमाळ येथील मनी ट्रान्सफर ऑफिसमध्ये २५ हजार रुपयांची फसवणूक

खेड : तालुक्यातील लोटेमाळ येथील श्री एंटरप्रायजेस मनी ट्रान्सफर ऑफिसमध्ये एका महिलेसोबत २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२० ते ६. २५ च्या सुमारास एक अनोळखी पुरुष कार्यालयामध्ये आला. त्याने तक्रारदार महिलेला एअरटेल वॉलेटमधून येस बँकेच्या खात्यात २५ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर तो पळून गेला. या प्रकरणी महिलेने दि. ७ रोजी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी अंदाजे ३५ वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 09/Nov/2024