खेड तालुक्यातून २१ वर्षीय विवाहितेचे गूढ अपहरण; अज्ञात इसमाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खेड तालुक्यातून २१ वर्षीय विवाहितेचे गूढ अपहरण; अज्ञात इसमाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दाभिळ नाका सात्विन गाव येथील घटना; घरातून निघून गेलेली महिला अद्याप बेपत्ता

खेड : खेड तालुक्यातील दाभिळ नाका, सात्विन गाव येथून एका २१ वर्षीय विवाहितेचे अज्ञात इसमाने गैरकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता घरातून निघून दोन दिवस उलटूनही अद्याप घरी न परतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घरातून निघून गेलेली विवाहिता परतलीच नाही :

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सात्विन गाव दाभिळ नाका येथील रहिवासी सचिन भगवान कनकुटे (वय २८ वर्षे, व्यवसाय- नोकरी) यांच्या पत्नी सौ. सिंधुरा सचिन कनकुटे (वय २१ वर्षे) या सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०६:१५ या वेळेत कोणालाही काहीही न सांगता आपल्या राहत्या घरातून अचानक निघून गेल्या. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.

Aayurzil

अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय :

विवाहिता अद्यापपर्यंत घरी परत न आल्याने, तिला कोणीतरी अज्ञात इसमाने गैरकायदेशीरपणे परिरुद्ध (डांबून) ठेवण्याच्या वाईट उद्देशाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यावरून फिर्यादी सचिन कनकुटे यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू :

या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३२७/२०२६, भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) (माजी भा.दं.वि. कलम ३६५) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.