रत्नागिरी : जांभारी खारवीवाडा येथे दारू विक्री करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जांभारी खारवीवाडा येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. करण्यात आली. याबाबत पोलिस नाईक प्रसाद सोनावले (३८) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिला ही जांभारी येथे बेकायदेशीरपणे ५४० रुपयांची ५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. तिच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनिमय १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 09/Nov/2024