Ladki Bahin Yojana August Installment: ‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्टचा हप्ता अखेर खात्यात जमा; १५०० रुपयांसाठी महिलांची प्रतीक्षा संपली

Ladki Bahin Yojana August Installment: 'लाडकी बहीण' योजनेचा ऑगस्टचा हप्ता अखेर खात्यात जमा; १५०० रुपयांसाठी महिलांची प्रतीक्षा संपली

सामाजिक न्याय विभागाकडून ३३९ कोटींचा निधी वितरित

Ladki Bahin Yojana August Installment ची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता वर्ग झाल्याने महिला वर्गामध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. यापूर्वी रक्षाबंधनाचे औचित्य साधून जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी महिला प्रतीक्षेत होत्या. अखेर राज्य शासनाने निधी वितरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने आवश्यक त्या निधीची तातडीने व्यवस्था केली. यासाठी शासनाकडून तब्बल ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. शासन निर्णय जारी होताच प्रशासनाने निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली.

Mahrashi karve ANM

ऑगस्टचा हप्ता जमा झाल्याने आता महिलांनी आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासावी किंवा मोबाईलवर आलेल्या बँकेच्या मेसेजद्वारे पैसे जमा झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्राप्त झाल्यामुळे आता पुढील सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागले असून, ही योजना राज्यातील महिलांसाठी खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरत असल्याचे चित्र आहे.