MPSC Secretary Mahendra Harpalkar Transfer: MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर उचलबांगडी! सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी

MPSC Secretary Mahendra Harpalkar Transfer: MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर उचलबांगडी! सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला यश

MPSC Secretary Mahendra Harpalkar Transfer: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून आक्रमक झालेल्या स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पाळले असून, आयोगाचे वादग्रस्त सचिव महेंद्र हरपाळकर यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विविध परीक्षांचे नियोजन, पारदर्शकता आणि उत्तरतालिकांमधील गोंधळावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात जाऊन सचिव महेंद्र हरपाळकर यांच्यावर शाईफेक केली होती. या घटनेनंतर एमपीएससीच्या प्रशासकीय कारभारातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा मुद्दा राज्यभरात गाजला.

विद्यार्थी आणि विविध संघटनांच्या वाढत्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी समन्वय समिती व विद्यार्थी प्रतिनिधींशी विशेष बैठक घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या. या बैठकीत एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी सचिवां ची बदली करण्याचे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

Radhakrushna patapedhi

मुख्यमंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आगामी परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.