खेड : साखरमधील महिलेचा चुकून खोकल्याचे औषध समजून गवतनाशक विष प्यायल्याने मृत्यू

खेड : तालुक्यातील एका महिलेचा गवतनाशक विष प्यायल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घडली. मृत महिला २३ वर्षे वयाची होती. ती साखर गावातील रहिवासी होती.

दिनांक २८ ऑक्टोबर रात्री १०.३० वाजता तिने चुकून खोकल्याचे औषध समजून गवतनाशक विष प्याले होते. तिला तत्काळ उपचारासाठी चिपळूण, डेरवण, मुंबईतील के. एम. हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल आणि शेवटी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ससून हॉस्पिटलने मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. अंगाचे काही भाग रासायनिक विश्लेषणासाठी जतन करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 09/Nov/2024